Tags

, , , ,

तुझ्या पायरीशी कोणी सान-थोर नाही
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
वाव्लुनी उधळतो जीव माय्बाप्पा
वानवा ह्यो उरी पेटला

खेळ मांडला देवा खेळ मांडला …

सांडली का रीत-भात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू राहा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्यात खेळ मांडला

खेळ मांडला देवा खेळ मांडला …

उसवला गणगोत सार आधार कोणाचा नाही
भेगालाल्या भुई परी जीण अंगार जीवाला जाळी
बळ दे जुंझायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्राण जीव्हारात ताल दे
करपला रान देवा जळला शिवार
तरी नाही धीर सांडला

खेळ मांडला देवा खेळ मांडला …

~ गुरु ठाकूर (song from movie “Natrang”) ~

Advertisements