Tags

, , ,


घर असावे घरासारखे नकोत नुस्त्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती || ध्रु ||

त्या शब्दाना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी || १ ||

त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुस्ती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी || २ ||

या घरट्यातुनी पिल्लू उडावे दिव्य घेउनी शक्ति
आकांक्षांचे पंख असावे ठेवुनी उम्बर्ठ्यावर भक्ति || ३ ||

~ विमल लिमये ~

Advertisements