Tags

, , , , ,

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे…

==================================

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,

गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो…. १

सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,

अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं….२

सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,

त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे….३

आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा,

जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप खूप शुभेच्छा !!!

Advertisements