Tags

, , , , , , , ,


देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी

सह्याद्रीच्या कडयाकडून
छातीसाठी ढाल घ्यावी

वेडयापिशा ढगांकडून
वेडेपिसे आकार घ्यावे

रक्तांमधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी

भरलेल्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे

~ विंदा करंदीकर ~

Advertisements