Tags

, , , , ,

गुरुजी : तू शाळेत
कशासाठी येतोस धोंडू ?
धोंडू :
विद्या मिळवण्यासाठी गुरुजी !
गुरुजी : मग गाढवा तू
समोर फळ्याकडे पहायचं
सोडून पोरीनकडे काय
बघतोस ???
धोंडू :
अहो गुरुजी पोरींकडे
नाही पाहत मी. मी तर
विद्या कडे
पाहतो.आता तुम्हीच
सांगा ना गुरुजी विद्या मिळवण्यासाठी विद्येकडे
नाही पहायचं तर काय
फळ्याकडे पहायचं का ???

—————————————

वडील आपल्या मुलाला म्हणतात-
“यावेळी जर तू नापास झालास…..
तर मला बाबा म्हणायचं नाही.”
.
.
मुलगा निकाल घेऊन घरी येतो.
वडील- “काय रे काय लागला निकाल?”
मुलगा म्हणतो-
.
.
.
.
.
.
“चूप बस मधुकर…..
तू वडील असल्याचा हक्क गमावला आहेस.”

—————————————

एका रात्री बंड्याची बायको रात्री उशिरा घरी परत
आली बेडरूम मध्ये गेल्यावर तिने पाहिले कि ब्लांकेट
च्या बाहेर
२ ऐवजी ४ पाय दिसत आहे..ती जाम भडकली तिथे
असलेल्या झाडूने बदड बदड झोडपले
… … आणि पाणी पिण्यासाठी किचन मध्ये गेली असता तिथे बंड्या तिचीच वाट बघत पेपर वाचत बसला होता..
तो तिला प्रेमाने म्हणाला
“तुझे आई वडील आले आहेत, तुझी वाट बघून शेवटी ते
आपल्या बेडरूम मध्ये झोपले “
तू त्यांना भेटलीस का..?

—————————————

एका नविन जॉईन केलेल्या सरदार टिचरने ग्राऊंडवर मुलांना इकडे तिकडे पळतांना आणि बॉलसोबत खेळतांना पाहाले. तेवढ्यात सरदार टिचरचं लक्ष एका बाजुला एकटंच उभं असलेल्या एका मुलाकडे गेलं. त्याला त्या मुलाची किव आली आणि त्याने त्याच्यापाशी जावून त्याला विचारले,

” सगळं ठिक आहे ना?’

‘हो’ त्या मुलाने उत्तर दिले.

‘ मग तु तिकडे जावून त्या मुलांसोबत का खेळत नाहीस?’ त्याने विचारले.

‘नाही मी तिकडे नाही जाणार… मी इकडेच ठिक आहे’ त्या मुलाने उत्तर दिले.

‘ पण का?” सरदार टिचरने विचारले.

‘ कारण मी गोलकिपर आहे’ त्या मुलाने चिडून उत्तर दिले.

—————————————

एक माणूस आणि त्याच्या बायकोने दाताच्या डॉक्टरच्या ऑफिसमधे प्रवेश केला. तो माणूस डॉक्टरांना म्हणाला, ” डॉक्टर .. मी खुप घाईत आहे.. खरं म्हणजे बाहेर गाडीत माझे दोन मित्र बसून गोल्फ खेळायला जाण्यासाठी माझी वाट पाहत आहेत.. तुम्ही असं करा.. दाताला भूल वैगेरे देण्याच्या भानगडीत पडू नका आणि दात डायरेक्ट कडचीत पकडून ओढून काढा … आम्हाला 10 वाजता गोल्फ क्लबला पोहोचायचं आहे आणि आता 9.30 वाजुन गेले आहेत… इंजक्शन देवून भूलीचा असर पडण्यासाठी थांबण्यास माझ्याजवळ वेळ नाही आहे…”

त्या डॉक्टरने विचार केला, ‘ काय धीट माणूस आहे… भूल दिल्याशिवाय दात काढायला सांगतो… ‘ म्हणून त्या डॉक्टरने त्या माणसाला विचारले.

” साहेब .. कोणता दात काढायचा आहे?”

तो माणूस आपल्या बायकोकडे वळत म्हणाला, ” हनी जरा तोंड उघड आणि त्यांना दाखव बरं”

—————————————

लग्नानंतर झंप्याच्या बायकोने विचारले
तुम्हाला पूर्वी किती मैत्रिणी (Girlfriends) होत्या..??

झंप्याने तिच्या पुढे शेंगदाण्याचा डबा ठेवला
त्यात काही शेंगदाणे आणि ६० रुपये होते

झंप्या-”जेव्हा जेव्हा मला नवीन मैत्रीण मिळत गेली,
तेव्हा तेव्हा एक शेंगदाणा मी या डब्यात टाकत गेलो.”

त्याच्या बायकोने सर्व शेंगदाणे मोजले तर किमान ११ निघाले

बायको- “म्हणजे तुम्हाला एकून ११ मैत्रिणी होत्या आणि या ६० रुपायचे काय ?

झंप्या: ” मी परवाच त्यातील १ किलो शेंगदाणे विकले, त्याचेच ६० रुपये आले..

—————————————

एका भिकार्याच लग्न होतं…
लग्न नंतर बायको नाव घेते…
“चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय..
चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय..
वैदू भिकार्याच नाव घेते ..
दे गं माय…
दे गं माय… “

—————————————

वेगवेगळया वयात परीक्षेचा अभ्यास कसे करतात याचे एक दम फालतू उदाहरण

१ ली ते ३ री : मी संपूर्ण अभ्यास केला परीक्षेसाठी…!!!

४ थी ते ६ वी : अरे यार काही प्रश्न खुपच अवघड होते मग मी ते सोडून दिली..!!!

६ वी ते १० वी : मी फक्त महत्वाचे प्रश्न वाचले..!!!

११ वी ते १२ वी : मला वाटते ४ धडे बास पास व्हायला…!!!

कोलेज: अरे आज एक्झाम होती कोणी बोलले नाही…!!!

—————————————

सर – homework का नाही केला?

मुलगा – सर लाईट गेले होते.

सर – मेणबत्ती लावायची मग..

मुलगा – काडेपेटी नव्हती.

सर – का?

मुलगा – देवघरात होती.

सर – घ्यायची मग.

मुलगा – अंघोळ नव्हती केली.

सर – का?

मुलगा – पाणी नव्हत.

सर – का?

मुलगा – मोटार चालू होत नव्हती.

सर – का?

मुलगा – आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून.

—————————————

डॉक्टर : तुमचं वजन किती?

रुग्ण : चष्मा धरून साठ किलो.

डॉक्टर : (विचारात पडतात आणि मग विचारतात)

आणि चष्म्याशिवाय?

रुग्ण : दिसतच नाही हो.

—————————————

बायको : अहो,तो काल आलेला भिकारी मला अजिबात नाही आवडला ……..

नवरा : का ग काय झाले?

बायको : काल मी त्याला खायला अन्न दिले आणि

तो मला आज पुस्तक गिफ्ट करून गेला.

नवरा: अगं मग न-आवडण्यासारखे काय त्यात?,

असे कोणते पुस्तक दिले?

बायको : “ अन्न कसे शिजवावे ”

—————————————

एका बिहारीच्या मित्राने त्याला फेसबुक बद्दल सांगितल.

बिहारीने पण आपला फेसबुकवर अकाऊंट उघडला.

सर्व पाहुन तो फारच गोंधळला, त्याला काय करावे तेच सुचेना.

त्याने मित्राला काय करायच ते विचारल.

त्याच्या मित्राने त्याला सांगितला,”फेसबुकच्या वॉलवर आपल्याला वाटेल ते लिहायच असत.”

बिहारीने फार विचार केला व लिहीले,”यहॉ पेशाब करना मना है ।”

—————————————

पांडू हवालदाराने चार शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले पाहून इन्स्पेक्ट र प्रधान हतबुद्धच झाले.

त्यांनी विचारले,”काय रे पांडू, हा काय प्रकार?”

”अहो, या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार केला.”

इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्न पडून इ. प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला.

पहिल्या पोराला विचारलं,”तुझं नाव काय आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास राणीच्या बागेत?…”

पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला,”माझं नाव नन्या. मी सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न करत होतो.”

आता दुसरा मुलगा.”माझं नाव मन्या. मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.”

तिसरा मुलगा.”माझं नाव विन्या. मी पण सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.”

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला

आणि म्हणाला,”माझं नाव शेंगदाणे.”

—————————————

एकदा एक मुलगी धाय मोकलून रडत असते .
तिची आई विचारते ” काय झालं बाळा ?”
“आई मी काय चेटकिणी सारखी दिसते ?”
” नाही बाळा, अजिबात नाही.”
” माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत ?”
” नाही ग, अजिबात नाही…”
” मी काय चापट्या नाकाची आहे ?”
” कोण म्हणालं, अजिबात नाही….”
” मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?”
” छे छे अजिबात नाही …”
.
.
.
.
.
.
.
.
.
.
” मग मला सगळे मी माझ्या आई सारखी दिसते असे का म्हणतात ?”

—————————————

पुणेरी झणझणीत झटका……

पुण्यात एका हॉटेलमध्ये दोन उतारू उतरले.

हॉटेलची व्यवस्था पाहून पुणेरी खवचटपणा करण्याची त्यांना लहर आली.

त्यांनी मॅनेजरला विचारले, ‘‘तुमच्या गोठ्याचे भाडे किती ?’’

‘‘एका बैलाला तीनशे रुपये, दोन बैलांचे पाचशे फक्त’’ मॅनेजर म्हणाला !

—————————————

एक मुलगा एकदा शिला बसलेला असतो, तेव्हाच तो बिस्कीट पण खात असतो.

समोरून एक सदगृहस्थ जात असतात, ते म्हणतात अरे बाळा असे शी करताना खाऊ नये.
मुलगा ऐकून न ऐकल्या सारखे करतो.
ते काका परत म्हणतात बाळा असे केलेस तर तुझ्या पोटात जीवजंतू जातील, तू आजारी पडशील.
ते कार्ट चिडून म्हणते काका आता जाता कि बुडवून खाऊ.

—————————————

डॉक्टर : माझ्या सेक्रेटरीशी बोलून भेटीची वेळ फिक्स करा.

पेशंट : दोनदा प्रयत्न केला… पण तिने नकार दिला भेटायला !!

—————————————

बायको : अहो तुम्ही म्हणाला होतात ना की,

मी आता करणाशिवाय दारू पिणार नाही म्हणून मग आता का पिताय?
नवरा : अगं आता दिवाळी जवळ आली ना ,
मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का?…

—————————————

😉 🙂 😀 😛 🙂 😉

Advertisements