Tags

, , , , , , ,

लाख क्षण अपुरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चूक पुरेशी आहे
ते दिशाहीन नेण्य्साठी

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचे शिखर गाठण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरून खाली गडगडण्यासाठी

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितीदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी

किती सराव करावा लागतो
विजयश्री वर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा अळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी

कितीतरी उत्तर अपुरी पडतात
आयुष्याचे गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातून जावे लागते
आयुष्य कोडे आहे पटण्यासाठी

विश्वासाची उब द्यावी लागते
प्रत्येक नात्याला जीवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड पुरेसा आहे
ते कायमचा उद्वस्थ करण्यासाठी

Advertisements