Tags

, , , , , , ,

कुणी म्हणत जग हे असं असतं,
कुणी म्हणत जग हे तसं असतं.
म्हणून तर नाही, मला कळत,
जग हे नेमक कसं असतं ?

इथे जीवाला जीव देणारे असतात,
तर मजेसाठी, दुसर्याचा जीव घेणारे ही भेटतात.
इथे चिखलात उगवलेल्या कमळला, पावित्र्याचे वरदान आहे,
पण मैत्रीच्या गुलाबाला मात्र, स्वार्थाच्या काटे?

अमाप अशा, जगाचा पसारा तो किती?
माणसांच्या गर्दीला म्हणती नातीगोती.
निष्काम प्रेमाचा ओलावा, मात्र दिसत नाही कोठे,
इथे तर साऱ्यांनीच चढवले, चेहऱ्यावर कपटी मुखवटे…!

रोजच्या ह्या धावा-धावीत हरवतो जगण्याचा सूर,
सारेच इथे धावती, सुखाच्यापाठी फुटेस्तोवर ऊर.
पैश्याची गणते… रुपैची कोडी,
सोडविता विस्कटते कधी, आयुष्याची घडी.

पण नकली अशा ह्या दुनियेत सारेच नाही खोटे.
काही भास मनाला, वाटती का सत्यापेक्षा नेटे…?
भासांच्या ह्या जगात एक ‘विश्व’ असतं फुलत,
स्वप्नांच्या पंखांवर हळुवार जात उमलत.

तिथे असतं प्रत्येकाला सुख, तिथे असतं साम्राज्य,
म्हणून तर सारे त्याला म्हणती मनोराज्य…!
तिथे असतं खंर प्रेम, तिथे असतो जिव्हाळा,
तिथे नसतात मत्सराचे वारे, किंवा क्रोधाच्या ज्वाळा.

मनाच्या ह्या देशात सारेच आहेत लहरी,
उल्हास आणि आनंदाच्या येती सरी वर सरी.
‘मन’ हे इथे घेई, पक्ष्यासारखी आभाळी भरारी,
मासा होवून कधी जाई, सागराच्या तळी.

इथे प्रेमाच्या घरला, असते विश्वासाचे छत,
कर्तृत्वाच्या प्रकाशाने, उजळे सारा आसमंत.
कष्टाच्या मीठ-भाकर, लागे गुळापेक्षा गोड,
मायेच्या उबदार पंखाखाली, रोज येई शांत झोप.

स्वप्नातील ‘फुलांसारख’ बहरलेले हे जग,
प्रत्येकाच्या नशिबात नसतं.
म्हणून तर सत्यात जगणं,
ह्याला “आयुष्य” हे नाव असतं, ह्याला “आयुष्य” हे नाव असतं.

~ आरती ~

life-is-such

Good evening folks,

Today’s post is in my mother tongue, “Marathi”.

Actually just scribbled some words from poetry diary to the blog, those who understand…? do let me know, if you felt it is any better than the previous one.

Hope enjoyed your day and do have relaxed evening ahead. 🙂

Advertisements