Tags

, , , , , , , , , ,

life-quote

कुणी म्हणत आयुष्य हे अस जगायचा असत
कुणी म्हणत आयुष्य हे तसं जगायचा असत
म्हणून तर मला नाही कळत,
आयुष्य नेमक कसं जगायच असत…?

इथे जीवाला जीव देणारे ही असतात,
तर मजेसाठी, दुसर्याचा जीव घेणारे ही भेटतात…

इथे चिखलात उगवलेल्या कमळला, पावित्र्याचे वरदान आहे,
पण मैत्रीच्या गुलाबाला मात्र, स्वार्थाच्या काटे ?

अमाप अशा, जगाचा पसारा तो किती?
माणसांच्या गर्दीला म्हणती नातीगोती.

निष्काम प्रेमाचा ओलावा, मात्र दिसत नाही कोठे,
इथे तर साऱ्यांनीच चढवले, चेहऱ्यावर मुखवटे…!

रोजच्या ह्या धावा-धावीत हरवत जातो जगण्याचा सूर,
सारेच धावती, सुखापाठी फुटेस्तोवर ऊर.

पैश्याची गणते…रुपयांची कोडी,
सोडविता-सोडविता विस्कटते कधी, आयुष्याची घडी.

पण नकली अशा ह्या दुनियेत सारेच नाही खोटे.
काही भास मनाला, वाटती का सत्यापेक्षा नेटे…?

प्रत्येकाच्या मनात इथे, स्वतंत्र विश्व असतं फुलत
स्वप्नांच्या पाकळ्यां, हळुवार जाती उमलत.

तिथे असतं प्रत्येकाला सुख, तिथे असतं साम्राज्य,
म्हणून तर सारे त्याला म्हणती मनोराज्य…!

तिथे असतं खंर प्रेम, तिथे असतो जिव्हाळा,
तिथे नसतात मत्सराचे वारे, किंवा क्रोधाच्या ज्वाळा.

मनाच्या ह्या देशात सारेच आहेत लहरी,
आनंदाच्या येती सरी वर सरी.

‘मन’ इथे कधी घेई, पक्ष्यासारखी आभाळी भरारी,
मासा होवून कधी जाई, सागराच्या तळी.

मनाच्या ह्या राज्यात प्रेमाच्या घरला, असते विश्वासाचे छत,
कर्तृत्वाच्या प्रकाशाने, उजळे सारा आसमंत.

कष्टाच्या मीठ-भाकर लागे गुळापेक्षा गोड,
मायेच्या उबदार पंखाखाली, येई रोज शांत झोप.

स्वप्नातील ‘फुलांसारख’ बहरलेले हे जग,
वास्तवात मात्र कुठेच नसत.

पण त्याची सुंदर आठवण, मनात जपत जगणे
ह्याचेच नाव “आयुष्य” असतं.

~ आरती ~

Advertisements