Tags

, , , , , , , , , , , , , , , , ,

आयुष्यावर बोलू काही ह्या कार्यक्रमातील मला आवडलेल्या कविता… 🙂

कवी – संदीप खरे
गायक – सलील कुलकर्णी

******

आयुष्यावर बोलू काही…

******

जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाही डोळे तोवर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…

तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरुदे त्याची नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…

हवे हवेसे दुख: तुला जर हवेच आहे
नको नकोसे हलवे कातार बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…

उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…

शब्द असुदे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही…

जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही… 🙂

******

दिवस असे की…

******

दिवस असे की कोणी माझे नाही,
अन् मी कोणाचा नाही…

आकाशाच्या छत्री खाली भिजतो,
आयुशायावर हसणे थुंकुनी देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणावत नाही…

प्रशणांचे हे एक संध से तुकडे,
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्या ला लगाम शोधत आहे,
पर मझला गवसत नाही…

दिवस असे की कोणी माझे नाही
अन् मी कोणाचा नाही…

मी तुसडा की मी भगवा बैरागी
मद्यापेवा मी गंजेवला जोगी
अस्तित्वाला हाझार नवे देतो
पर नाव ठेवावत नाही…

दिवस असे की कोणी माझे नाही
अन् मी कोणाचा नाही…

मीमी म्हणतताना आता हस्तो थोडे
मीटून घेतो वस्तू स्टितीचे डोळे
या जगण्याला स्वप्ना चे हे आता
मेघ पेलावत नाही…

दिवस असे की कोणी माझे नाही…
अन् मी कोणाचा नाही… 😦

******

नसतेस घरी तू जेव्हा

******

नसतेस घरी तू जेव्हा,
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरते धागे,
संसार फाटका होतो…

नसतेस घरी तू जेव्हा
नभ फाटून वीज पडावी,
कल्लोळ तसा ओढवतो
हि धारा दिशाहीन होते
आन चंद्र पोरका होतो…

नसतेस घरी तू जेव्हा
येतात उन्हे दराशी,
हिरमुसून जाती मागे,खिडकीशी थबकून वारा
तव गंध वाचून जातो…

नसतेस घरी तू जेव्हा
तव मिठीत विर्गाल्नार्या मज स्मरती लाघव वेळा
स्वसाविन हृदय आडवे
मी तसाच अगतिक होतो…

नसतेस घरी तू जेव्हा
तू संग सखे मज काय, मी सांगू या घरदार
समयीचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो…

नसतेस घरी तू जेव्हा
न अजून झालो मोठा, न स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो…

नसतेस घरी तू जेव्हा,
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरते धागे,
संसार फाटका होतो…

नसतेस घरी तू जेव्हा… 😦

******

लव्हलेटर…

******

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं

सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं

गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं

घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं

ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं

सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं

आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं

पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं

वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं

शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं

नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं

होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं

५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं

ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं

सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं

हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं

लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं

अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं

तिसर्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतां

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं… 😉

******

हे भलते अवघड असते

******

गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते… हे भलते अवघड असते…
कुणी प्रचंड आवडणारे… ते दूर दूर जाताना…
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना…
डोळ्यातील अडवून पाणी… हुंदका रोखुनी कंठी…
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते…

तरी असतो पकडायाचा… हातात रुमाल गुलाबी…
वार्‍यावर फडकवताना… पाह्यची चालती गाडी…
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली…
गजरा माळावा इतुके… ती सहज अलविदा म्हणते…

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू…
इतक्यात म्हणे ती – माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते… मग सहजच हळवी होते…
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते…

कळते की गेली वेळ… ना आता सुटणे गाठ…
आपुल्याच मनातील स्वप्ने… घेऊन मिटावी मूठ…
ही मूठ उघडण्यापूर्वी… चल निघुया पाऊल म्हणते…
पण पाऊल निघण्यापूर्वी… गाडीच अचानक निघते…

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी…
ओठावर शीळ दिवाणी… बेफिकीर पण थरथरती…
पण क्षण क्षण वाढत असते… अंतर हे तुमच्यामधले…
मित्रांशी हसतानाही… हे दु:ख चरचरत असते…

हे भलते अवघड असते… 😦

******

मी मोर्चा नेला नाही

******

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही… 🙂

******

एवढंच ना?

******

******

दमलेल्या बापाची ही कहाणी

******

कोमेजून निजलेली एक परी राणी उतरले तोंड,
डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे
काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या बापाची ही कहाणी तुला….
ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना….

आटपाट नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा
तरी लोकलची वारी रोज सकाळीच
राजा निघताना बोले गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला….
ना ना ना ना ना॥ ना ना ना ना ना…

(संदीपचा आवाज) गद्य: ऑफिसात उशीरा मी असतो बसून भंडावले डोके गेले कामात बुडून तास-तास जातो खाल मानेने निघून एक-एक दिवा जातो हळूच विझून अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

(सलीलचा आवाज) पद्य: उधळत खिदळत बोलशील काही बघताना भान मला उरणार नाही हसूनिया उगाचच ओरडेल काही दुरूनच आपल्याला बघणारी आई तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या बापाची ही कहाणी तुला…. ना ना ना ना ना ना ना ना ना….

(संदीपचा आवाज) गद्य: दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई मऊ-मऊ दूध भात भरवेल आई गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

(सलीलचा आवाज) पद्य: कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला आईपरी वेणी फणी करतो ना तुला तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या बापाची या कहाणी तुला….
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना….

(संदीपचा आवाज) गद्य: बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं दूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं

(सलीलचा आवाज) पद्य: असा गेलो आहे बाळा पुरा अडकून हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून असा कसा बाबा देव लेकराला देतो लवकर जातो आणि उशीरानं येतो बालपण गेले तुझे-तुझे निसटून उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये ना ना ना ना ना ना ना ना ना ना…

******

डिपाडी डिपांग

******

डिपाडी डिपांग डिचिबाडी डिपांग
इडिबाडी डिचिबाडी डिपांग ।२। ||ध्रु||

काळी माती निळं पानी हिरवं शिवार
ताज्या ताज्या माळव्याचा भुईला या भार
ज्वानीच्या या मळ्यामन्दी पिरतीचं पानी
बघायाला कवतिक आलं नाही कुनी
मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय
अन् राणी माझ्या मळ्यामन्दी घुसशील काय ||१||

काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा
मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा
लिंबावानी कांती तुझी विटावानी ओठ
टम्बाट्याचं गाल तुझे भेंडीवानी बोटं
काळजात मंडई तु मांडशील का
अन रानी माझ्या मळ्यामन्दी घुसशील का ||२||

नको गाऊ भाजीवाल्या पिरतीची गानी
शिळ्या शिळ्या भाजीवर शिंपडुन पानी
ओसाड्याच्या गावी तुझा ओसाडाच मळा
गुलाबाला सोसवना उन्हाळ्याच्या झळा
strawberry ला कांदा कधी शोभनार नाही ||३||

तुझ्यासाथी जिवाराची केली मशागत
खुरपला जीव दिलं काळजाचं खत
राखायला मळा केली डोळ्याची या वात
बुजगावन्या च्या परी उभा दिन रात
नको जळू दिन रात नको जीव टांगू
ठाव हाय मला सारं नको काही सांगू
पिरतीत राज्या तुझ्या नाही काही खोड
तुझ्या हाती मिरचीबी लागतीय गोड
माज्यासंग मळा तुझा कसशील काय ||४||


संदीप खरे